Thursday, February 4, 2010

नमस्कार

मी इकडे रशियामध्ये एका मोठ्या स्टील प्लांटवर सेल्स मध्ये नोकरी करतो. आणि फुटकळ लेखन करतो. अर्थात ते सर्व फक्त माझ्यासाठीच असते. मी स्वतःची इ-डायरी मराठीमध्ये लिहितो.

मी खरं तर कधी ऑनलाईन लिहिले नाही. पण आपणांपासून प्रेरणा घेऊन आता (आता म्हणजे या क्षणी) एक ब्लॉग सुरु करत आहे. "मनाच्या धुंदीत"... म्हणून त्या ब्लॉगला नाव पण तेच ठेवणार ""मनाच्या धुंदीत". सध्या तरी माझी ओळख आणि माझ्याबद्दल अशीच एक पोस्ट टाकतो. पण लवकरच हा ब्लॉग ओसंडून वाहायला लागेल याची खात्री बाळगा.

मी नेहमीच कामासंदर्भात संपूर्ण रशियामध्ये कायम फिरत असतो. आजवर तिथेले जीवन, संस्कृती, लोक यांबद्दल आजवर डायरीत लिहिले आता ब्लॉगवर पण लिहिणार.

मराठी ब्लॉगर्स मीटचे आणि संयोजकांचे हा ब्लॉग सुरु करण्यामागे फार मोठे योगदान आहे.

4 comments:

  1. अजितजी,
    सप्रेम नमस्कार ! आपल्यासारखे आमच्या पाठीवर थाप देणारे असल्यावर चिंता कसली ? आपण मराठीत ब्लॉग सुरू केलाय हे ऐकून समाधान वाटले. आम्हीच आमची मराठी वाढवायला हवी ना ? आपल्या पुढल्या पोस्ट व रशियन जीवन जाणून घ्यायची आतुरतेने वाट पहात आहोत.

    सुरेश पेठे

    ReplyDelete
  2. नमस्कार,
    आपले अभिनंदन ब्लॉग सुरु केलात व शुभेच्छा…पुढील लिखाणासाठी....

    ReplyDelete
  3. पुढील ब्लॉगची वाट पहात आहे.

    ReplyDelete
  4. अजितजी,
    आम्ही आपल्या पोस्ट्स ची आतुरतेने वाट पहात आहोत. आपणांस काही अडचण तर येत नाही ना? असेल तर इथेच मांडा, त्यावर आपण काही तरी उपाय नक्कीच शोधू शकू .

    ReplyDelete